Nagpur Mahanagarpalika : नागपूर येथे नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, नागपूर नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीमुळे अनेकांना नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. (Nagpur)
या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. दरम्यान, महापालिकेद्वारे “विधी अधिकारी सहाय्यक” या पदासाठी भरती निघाली असून, यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
कोणत्या आणि किती पदांसाठी निघाली भरती
नागपूर महापालिकेमध्ये विधी अधिकारी सहाय्यक” या पदासाठी भरती निघाली असून, या भरतीद्वारे एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहे. (Recruitment)
पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदभरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. तर सोबतच अर्जदाराला विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतरचा व संबंधीत न्यायालयातील लिगल प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
इच्छुक उमेदवारांनी खालील पदाकरीता दिनांक 11/04/2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे. तर या भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीचे स्थळ :- तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर हे आहे.
वेतन
या भारतीद्वारे विधी अधिकारी सहाय्यक या पदासाठी Rs. 20,000/- per month इतका पगार दिला जाणार आहे.
संकेतस्थळ
दरम्यान, या पद भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट http://www.nmcnagpur.gov.in ला भेट द्यावी.