मुंबई | सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयां अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे.
याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 62 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.
या भरती अंतर्गत कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट ‘क’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2024 आहे.
- वयोमर्यादा –
- कल्याण संघटक – वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- कवायत प्रशिक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- शारीरिक प्रशिक्षण निदेशक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- वसतिगृह अधीक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- वसतिगृह अधिक्षीका – वय ४५ वर्षापेक्षा जास्त नाही.
- अर्ज शुल्क –
- (एक) अराखीव (खुला) – रुपये १०००/-
- (दोन) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – रुपये ९००/-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कल्याण संघटक | ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. |
वसतिगृह अधीक्षक | ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी म्हणून किमान ५ वर्ष सेवा केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. |
वसतिगृह अधिक्षीका | भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नी ची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. |
कवायत प्रशिक्षक |
(i) ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे. (ii) ज्यांनी संरक्षण दलातील कवायत प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. |
शारीरिक प्रशिक्षण निदेशक | (i) ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे. (ii) ज्यांनी संरक्षण दलातील शारिरिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. |
PDF जाहिरात – Sainik Welfare Maharashtra Notification 2024
ऑनलाईन अर्ज – https://mahasainik.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट – https://mahasainik.maharashtra.gov.in/