Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिकेत भरती

  


नाशिक महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्..


महापालिकेत ‘क’ वर्गाच्या मंजूर पदांची संख्या 7082 असताना, विहित वयोमानानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या 2600 झाली आहे. सध्या पालिकेत केवळ 4500 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरी सुविधा देताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत होता. भरतीसाठी सरकारची 35 टक्के आस्थापना खर्च मर्यादा अडचणीची ठरत आहे.


महत्वाच्या भरती2017 पासून महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीची फाईल मंजुरीअभावी मंत्रालयात पडून असतानाही ही भरती रखडली होती. अखेर, नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील 348 आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील 358 पदांसह 706 पदांसाठी सेवा प्रवेश नियमांना मान्यता दिली.


नोकरीचे ठिकाण – नाशिक

पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

एकूण पदे –

आरोग्य विभाग : ३५८

अग्निशमन विभाग : ३४८

एकूण पदे : ७०४

उर्वरित २,००० पदे नगरविकासच्या निर्णयामुळे महापालिकेत भरती

नोकरीसाठी अर्ज कसा करावा


महापालिका स्तरावर या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सलग दोन निर्णयांमुळे गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेली महापालिकेतील नोकरभरती विविध कारणांमुळे प्रश्नांच्या भोवऱ्यात आली आहे. राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने या नोकरभरतीत अडथळा ठरणारी ३५ टक्के आस्थापना प्रशासनाने प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी केल्याने महापालिकेत आता ७०४, नव्हे तर २,८०० पदांसाठी जम्बो भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने