PMC Recruitment 2023: घाई करा; पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी भरती; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

 




मुंबई : पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, 




कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमनया पदांसाठी ही भरती असणार आहे. 




पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 असणार आहे.




या जागांसाठी भरती


क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन




शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.




उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.




 माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html  या लिंकवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने