वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
DMER Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे. लक्षात घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 10 मे पासून सुरु झाली आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागा
या भरती अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, इलेक्ट्रोकार्डियोग्राफी तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, आहारतज्ञ, फार्मासिस्ट, डॉक्युमेंटलिस्ट/कॅटलॉगर/ग्रंथलेखक, सामाजिक सेवा अधीक्षक (वैद्यकीय), ऑक्युपेशनल थेरपिस्ट/थेरपी टेक्निशियन,
टेलिफोन ऑपरेटर, महिला अधीक्षक/वसतिगृह अधीक्षक, एक्स-रे तंत्रज्ञ, एक्स-रे असिस्टंट किंवा डार्क रूम असिस्टंट, सांख्यिकी सहाय्यक, डेंटल हायजिनिस्ट/डेंटल हायजिनिस्ट, फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, शारीरिक शिक्षण संचालक, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, इत्यादी. पदांच्या एकूण 5182 जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे असावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
खुला वर्ग: 1000/- + बँक शुल्क मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ अनाथ: . 900/- + बँक शुल्क असे आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
ऑनलाईन अर्जाची लिंक
इच्छुक उमेदवार https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html या लिंकवर जाऊन अर्ज सादर करू शकतो.