Government Job : महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान,इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
उपसंचालक (भूजल) – 1. भूशास्त्रातील पदव्युत्तर, पीएचडी धारकास प्राधान्य. 2. भूजल सर्वेक्षण आणि विकास किंवा शासकीय विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर किमान ५ वर्षांच्या कामाचा अनुभव. 3. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. 4. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
अध्यक्षांचे खाजगी सचिव – 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. 2. मराठी व इंग्रजी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि 3. मराठी व इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि
अवर सचिव व आवर सचिव (विधी) 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवीधर. 2. विधीमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य. 3. विधी व न्याय विभागामध्ये अवर सचिव पदावर काम केल्याचा अनुभव.
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकण मुंबई हे आहे.
वयोमर्यादा
उपसंचालक (भूजल) – 61 वर्षे
अवर सचिव व आवर सचिव (विधी) – 61 वर्षे
अध्यक्षांचे खाजगी सचिव – 61 वर्षे
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तर यासाठी मुलाखतीची तारीख 17 मे 2023 ही आहे. दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट : http://mwrra.maharashtra.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
उपसंचालक (अर्थशास्त्र) – Rs. 1,35,720/- per month
उपसंचालक (भूजल) – Rs. 1,35,720/- per month
अध्यक्षांचे खाजगी सचिव – Rs. 1,17,405/- per month
सहायक संचालक (अंबलबजावणी) – Rs. 1,17,405/- per month
अवर सचिव व आवर सचिव (विधी) – Rs. 98,265/- per month
कक्ष अधिकारी – Rs. 81,540/- per month
लिपिक सहायक – Rs. 66,590/- per month