Police Bharti 2023 | Pune Police Force recruitment for various posts! : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल आणि तेही सरकारी तर तुमच्यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे.पुणे पोलीस दल (Police Bharti 2023) अंतर्गत ”लोअर ग्रेड स्टेनिस्ट, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक” पदांसाठी एकूण रिक्त जागा ०४ भरण्यात येणार आहे.
तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, तुम्ही जर ह्या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा.भरती पद्धत हि थेट मुलाखतीद्वारे होणार असून मुलाखत दिनांक ३० मे २०२३ रोजी उमेदवारांनी देण्यात आलेल्या पत्यावर वेळेवर उपस्तित राहावे.
त्यासोबत आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचावा तसेच अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF मार्फत दिलेली आहे ती पाहू शकता.
संस्थेचे नाव : पुणे पोलीस दल विभाग
एकूण जागा : ०४
पदाचे नाव व पदसंख्या : लोअर ग्रेड स्टेनिस्ट ०१ पद, वरिष्ठ श्रेणी लिपिक ०१ पद, लिपिक टंकलेखक ०२ पदे.
निवडप्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे.
शैक्षणिक पात्रता :
लिपिक टंकलेख – गट ब राजपत्रित तथा राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले. तसेच पत्रव्यव्हार शाखा, लेखा शाखा, विभागीय चौकशी, लेख शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करण्याचा कार्यालयीन अनुभव असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ श्रेणी लिपिक – गट ब राजपत्रित तथा राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले. तसेच पत्रव्यव्हार शाखा, लेखा शाखा, विभागीय चौकशी, लेख शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करण्याचा कार्यालयीन अनुभव असणे आवश्यक आहे.
लोअर ग्रेड स्टेनिस्ट -गट ब राजपत्रित तथा राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी रंकालेखन वेग १२० श.प्र.मि व इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि तसेच प्रमाणपत्रासह टंकलेखनाची प्रत्येक्ष चाचणी घेण्यात येईल.
वेतनश्रेणी :
लिपिक टंकलेखक – १२,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये प्रति महा वेतन राहील.
लोअर ग्रेड स्टेनिस्ट – ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये प्रति महा वेतन राहील.
वरिष्ठ श्रेणी लिपिक – २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये प्रति महा वेतन राहील.
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : ३० मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता .
मुलाखतीचा पत्ता : पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय, साधू वासवानी चौक, पुणे पिन – ४११००१
म्हत्वाचे :
भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होईल.
वरील पदासाठी आवश्यक ते मूळ कागदपत्रे घेऊन मुलाखती स्थळी उपस्तित राहावे.
बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे फोटो ०३, कोठ=तेही शासकीय ओळखपत्र, सेवानिवृत्त असल्याची PPO मूळ प्रत तसेच इतर प्रमाणपत्र.
भरती प्रक्रियेसाठी येणार्यांना स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक (कुठलाही भत्ता नाही)
मुलाखतीस वेळेनंतर उपस्थित उमेदवार बाद करण्यात येईल.
मुलाखत स्थळी ३० मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता उपस्तित राहावे.
अधिक माहितीसाठी तुम्ही PDF जाहिरात बघू शकता