10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, 125 रिक्त जागा.. महिन्याला लाखात पगार | DFSL Mumbai Bharti 2024

 



मुंबई | न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (DFSL Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 125 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



अधिसूचनेनुसार,  वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.



DFSL Mumbai Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.



  • परीक्षा शुल्क (फी) –
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
    • मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-

शैक्षणिक पात्रता –
1. वैज्ञानिक सहायक – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण



3.  वरिष्ठ लिपिक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
4. कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण



5. व्यवस्थापक – माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.


पदाचे नाववेतनश्रेणी
वैज्ञानिक सहायकS-13 (35400-112400)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायकS-8 (25500-81100)
वरिष्ठ लिपिकS-8 (25500-81100)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायकS-7 (21700-69100)
व्यवस्थापकS-10 (29200-92300)

PDF जाहिरात – DFSL Maharashtra Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – Online Application For DFSL Vacancy 2024
अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/

DFSL Mumbai Bharti 2024 Important Documents 

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस. सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता).
  • वयाचा पुरावा.
  • शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा.
  • सामाजिदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
  • अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.

  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा.


  • अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु. घ. व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • अनुभव प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने