नागपूर | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024) येणार आहेत.
जागांच्या बाबतीत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सदर जागा थेट मुलाखतीव्दारे भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर, महावत पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी | स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. |
कायदा अधिकारी | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी अॅडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. |
MSTrIPES व्यवस्थापक | कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण, टंकलेखन गती- 40 शप्रमी (इंग्रजी) 30 श.प्र.मि मराठी / हिंदी (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) |
चाराकटर | किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. |
महावत | किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुवैद्यकीय अधिकारी | 50,000/- |
कायदा अधिकारी | 50,000/- |
MSTrIPES व्यवस्थापक | 20,000/- |
चाराकटर | 15,000/- |
महावत | 25,000/- |
PDF जाहिरात – Pench Tiger Reserve Nagpur Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/