मुंबई | राज्यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले (Gram Sevak Bharti 2024) आहेत.
अर्ज भरून तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो उमेदवार परीक्षेची प्रतिक्षेत असून तातडीने परीक्षा घेण्याची मागणी शासनाकडे करत आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती परीक्षा घेण्याची मागणी केली जात आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75 हजार शासकीय नोकर्यांची घोषणा केली होती.
Gram Sevak Bharti 2024
त्यानुसार काही विभागांत पदभरती राबविण्यात आली. त्यानुसारच भरती प्रक्रिया सुरू आहे.
परंतु ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांसाठी अर्ज भरून तीन महिने लोटले तरी परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.