Bombay High Court Bharti 2023 : 7वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती जाहीर करण्यात आलेली. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM)आहे.
एकूण रिक्त पदे : 160
पदाचे नाव: शिपाई/हमाल
शैक्षणिक पात्रता: किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट: 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 25 रुपये/-
पगार : 15000 ते 47600/- व नियमाप्रमाणे भत्ते
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM)
पात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-
१) तो/ती करार करणेस सक्षम असावा/असावी.
२) त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
३) त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी खटला नसावा. प्रलंबित
४) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी
उमेदवारांकरीता सूचना :-
१) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करतांना शुल्क १२५/- भरणे आवश्यक आहे आणि ते शुल्क परत मिळणार नाही.
२) अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
३) उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या/तिच्या करण्यात येईल. फक्त शेवटच्या अर्जाचा विचार
४) अल्प सूचीची यादी (Shortlisting) उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर (https://bombayhighcourt.nic.in) प्रकाशित झाल्यानंतर ज्या अर्जदारांचे नाव अल्प सुची मध्ये आहे त्यांनी शुल्क ११२५/- भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क परत केले जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
१. संगणकीकृत प्रोग्रामद्वारे ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाईल म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने शिपाई / हमाल पदासंबंधीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज हा इंग्रजी भाषेत भरला जाईल.
२. ‘शिपाई / हमाल’ पदासाठी इ. ७ वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. ‘शिपाई/ हमाल’ पदासाठी जर उमेदवार इ. ७ वी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे/तिच्याकडे इ. ७ वी चे गुणपत्रक नसेल तर, त्याने/तिने ‘ऑनलाईन’ अर्ज भरताना इ. ७ वी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद करावी जेणेकरुन त्याचा / तिचा अर्ज संगणकाकडून स्विकृत केला जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : bhc.gov.in
चारित्र (वर्तवणूक) प्रमाणपत्र: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा