Bombay High Court Bharati 2023 : नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी असून, बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2023) अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदभरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
दरम्यान, बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत “न्यायाधीश (कौटुंबिक न्यायालय)” या पदांच्या रक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदभरतीचा फायदा घ्यावा.
अर्ज करण्याची मुदत
या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. यामुळे अर्जदाराने अंतिम मुदती पर्यंत अर्ज करावेत. यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (Bombay)
शैक्षणिक पात्रता
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कमीत कमी सात वर्षे भारतातील न्यायिक कार्यालय किंवा न्यायाधिकरणाच्या सदस्याचे कार्यालय किंवा संघ किंवा राज्यांतर्गत कायद्याचे विशेष ज्ञान आवश्यक असलेले कोणतेही पद असणे आवश्यक आहे. किंवा कमीत कमी सात वर्षे उच्च न्यायालयाचा किंवा लागोपाठ अशा दोन किंवा अधिक न्यायालयांचा वकील असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण
या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे औरंगाबाद हे आहे. तर यासाठी अर्ज शुल्क हा मागासवर्गीय उमेदवार यांसाठी Rs.500/- इतका आकारला जाणार आहे. तर इतर उमेदवार यांसाठी Rs.1,000/- इतका आकारला जाणार आहे.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 43 वर्षे पूर्ण इतकी असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा
या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करायचा आहे. दरम्यान, ऑफलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई – 400 032 हा आहे. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 ही आहे. तर या पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 ही आहे.
दरम्यान, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://shorturl.at/moAGS या लिंकचा वापर करायचा आहे. तर या पदभरती बाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास अधिकृत वेबसाईट – http://bombayhighcourt.nic.in ला भेट द्यावी.
वेतन
रु.144840-194660 + महागाई भत्ता आणि नियमांनुसार स्वीकार्य इतर भत्ते.