SBI Bharati 2023 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदभरतीसाठी अर्ज करावा.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार ही भरती
या भरतीद्वारे “चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 1031 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा. (SBI Bharati 2023)
अर्ज करण्याची मुदत
या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. तर इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अंतिम मुदती पर्यंत अर्ज करावा.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 60 ते 63 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. दरम्यान, यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज कसा करावा
या पदभरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी http://shorturl.at/bGT45 या लिंक वरती क्लीक करावे.
दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in ला भेट द्यावी. आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – Rs.36,000/- per month
चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक – Rs. 41,000/- per month
सहाय्यक अधिकारी – Rs. 41,000/- per month