कृषी विभाग अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये १०६ रिक्त जागांची भरती सुरु; १,१२,४०० पगार | Krushi Vibhag Recruitment

 



ठाणे |  राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील (Krushi Vibhag Recruitment) कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पुणे व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील “वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक” ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक
पदसंख्या –
लातूर – 20 जागा
ठाणे – 26 जागा
कोल्हापूर – 18 जागा
नागपूर – 24 जागा
पुणे – 18 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क –
अमागास – रु. ७२०/- (Krushi Vibhag Recruitment)
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
PDF जाहिरात कोल्हापूर – shorturl.at/coL24
PDF जाहिरात ठाणे – shorturl.at/blwxE (Krushi Vibhag Recruitment)
PDF जाहिरात लातूर – shorturl.at/ovyJ0
PDF जाहिरात नागपूर – shorturl.at/aHIU4
PDF जाहिरात पुणे – shorturl.at/uPTX6

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ लिपिक –
१. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.
२. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. (Krushi Vibhag Recruitment)
सहाय्यक अधीक्षक –
१. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी.
२. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

वेतनश्रेणी –
वरिष्ठ लिपिक – S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहाय्यक अधीक्षक – S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल. (Krushi Vibhag Recruitment)
अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल 2023 आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल. (Krushi Vibhag Recruitment)
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने