10 वी आणि ITI उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी ! महावितरणमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच अर्ज करा

 






 


Mahavitaran Bharati 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती महावितरणच्या माध्यमातून. 




वास्तविक महावितरण नुकत्याच काही पदांसाठी एक भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील महावितरणने निर्गमित केली आहे.




  महावितरणमध्ये विविध रिक्त पदांच्या 320 जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.





कोणत्या पदांसाठी होणार भरती?

महावितरणमध्ये लाईनमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या दोन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.





किती रिक्त जागांसाठी होणार भरती?

लाईनमनच्या 291 रिक्त पदांसाठी आणि कम्प्युटर ऑपरेटरच्या 29 रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.





आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे जरुरीचे आहे. सोबतच संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारां उमेदवार 18 ते 30 वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मात्र नियमानुसार या ठिकाणी वयात सूट दिली जाणार आहे.





नोकरी करण्याचे ठिकाण

अहमदनगर येथे उमेदवारांना नोकरी करावी लागणार आहे.





अर्ज कसा करणार?

https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. किंवा अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर 414 4001 या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवले जाऊ शकतात.




अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदभरतीसाठी 17 मे 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे. विहित कालावधीमध्ये सादर झालेल्या अर्जावरच विचार होणार आहे. 





कालावधी उलटल्यानंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने