Government Job In Mumbai : 1 लाख पगारासह मिळवा मुंबई येथे सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या..






  Government Job In Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.





कोणत्या आणि किती पदांची होणार भरती

या भरती अंतर्गत “विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 02 पदे एका वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत. 






विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार – बालरोगतज्ञ (Pediactric) – 2 पदे शैक्षणिक अर्हता-

1) बालरोग शास्त्रातील MD / DNB / DCH डीग्री प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.

2) बाल क्षयरोग विभागात काम केलेल्या उमेदवारास विशेष प्राधान्य.





नोकरी ठिकाण

दरम्यान, या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

अर्ज पद्धती





या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येणार असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा – वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयात हा आहे.





दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 ही आहे. तर या भरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://portal.mcgm.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.





वेतन

विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार – Rs. 1,00,000/- per month


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने