Pune Jobs : पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान यामुळे अनेकांना नोकरीची उत्तम संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापक – 1. राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची किमान शिक्षण / अर्थशास्त्र / समाजकार्य/सार्वजनिक धोरण यामध्ये पदव्युत्तर पदवी. 2. किमान ५ वर्षे अनुभव, त्यापैकी किमान ३ वर्षांचा शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास व युवा संगठनासंदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे. 3. इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान ( लेखी व संभाषण) असणे आवश्यक. 4. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS Office, सोशल मीडिया डिझाईन टूल्ससह क्षेत्रातील प्रावीण्यासह
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करायचा आहे. या पदासाठी ई-मेला पत्ता – [email protected] हा आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 ही आहे.
दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.dhepune.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
प्रकल्प व्यवस्थापक – रु. ६०,०००/– ते ८०,०००/– प्रतिमाह ठोक मानधन देण्यात येईल.