विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त भरली जात असून इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत.
VNIT Nagpur Recruitment 2023 : विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त भरली जात असून इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत.
ही भरती प्रकल्प सहाय्यक पदांच्या 03 जागांसाठी होत आहे. येथे उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे 20 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. चला या भरती बद्दल आणखी माहिती जाणून घेऊया-
पदाचे नाव आणि रिक्त जागा – या भरती अंतर्गत प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (स्थापत्य) सह किमान 03 वर्षे अनुभव किंवा फ्रेश एम.टेक./ एमबीए/ पीएच.डी. असावा.
अर्ज शुल्क – यासाठी उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
वेतनमान – या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000/- रुपये इतके वेतन मिळेल.
नोकरी ठिकाण – ही भरती नागपूर (महाराष्ट्र) येथे सुरु आहे.
इमेल पत्ता – spwanjari@civ.vnit.ac.in
असा करा अर्ज
-या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करायचे आहेत.
-ई-मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे. अन्यथा अर्ज अपूर्ण मानला जाईल.
-भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी www.vnit.ac.in या वेबसाईटला भेट द्या.