बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पात्रताधारकांना नोकरीची सुवर्णसंधी.. त्वरित अर्ज करा | Bank of Baroda Bharti 2024

 



मुंबई | बँक ऑफ बडोदा (BOB) कडून रिक्त पदांच्या भरतीची (Bank of Baroda Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 22 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.


बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार  अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.



 यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.



Bank of Baroda Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
अग्निशमन अधिकारी02
व्यवस्थापक10
वरिष्ठ व्यवस्थापक09
मुख्य व्यवस्थापक01

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 मार्च 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 


देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात –  Bank of Baroda Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Bank of Baroda Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने