Teachers Recruitment : आता 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही TET पात्रता होणार बंधनकारक

 



  । महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार (Teachers Recruitment) करण्यासाठी केंद्र सरकार मोठे निर्णय घेत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा (TET) परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 



2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंबलबजवणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य होती. सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे; नंतर या निर्णयाला राज्य सरकार आपल्या व्यवस्थेत सामील करतील.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) अंतर्गत नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मुलांचे शिक्षण, नमुने तसेच शिक्षक होण्याच्या पात्रतेशी संबंधित हे बदल केले जात आहेत. आधी खाजगी किंवा सरकारी शाळेत आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी (TET) देणे आवश्यक होते. मात्र आता NEP अंतर्गत इयत्ता 9वी ते 12वीच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या टप्यात बारावीपर्यंत टीईटी हा नियम हरियाणा, केरळ, ओडिशा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. या राज्यांमध्ये STET (STET) म्हणजेच राज्य (Teachers Recruitment) शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 12 वी पर्यंत लागू करण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये बारावीपर्यंत टीईटीचा नियम लागू केला जाणार आहे.




केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय स्तरावरील शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. CTET स्कोअर आयुष्यभर वैध आहे. सीटीईटीच्या धर्तीवर आता टीईटी आयुष्यभर वैध करण्याची (Teachers Recruitment) योजना आहे.


 सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये, TET परीक्षेचा एक पेपर अजूनही इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे आणि दुसरा पेपर 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतला जातो. मात्र, आता तो इयत्ता नववी ते बारावीसाठी बंधनकारक केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने