सेंट्रल GST आणि कस्टम भरती पुणे येथे सुरू, पात्रता फक्त १० पास.

 





Central GST and Customs Recruitment Starts at Pune, Eligibility Only 10 Passes.: नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या साठी पुन्हा एकदा नवीन अपडेट आम्ही घेऊन आलो असून, तुम्ही जर १० पास असाल, तरी देखील अर्ज करू शकता.सेंट्रल GST आणि कस्टम(Central GST and Customs Recruitment) पुणे झोन येथे कँटिंग अटेंडंट पदासाठी एकूण रिक्त जागा ३ भरण्यात येणार आहे, तुम्ही जर ह्या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा.





नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या पत्यावर अर्ज वेळे आधी पाठवावा तसेच, शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत प्राप्त होईल असा पाठवावा. 





अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 11-०५-२०२३ असणार आहे. अधिक माहितीसाठी हा लेख वाचावा तसेच अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत मूळ प्रत PDF दिलेली आहे ती पाहू शकता.





एकूण जागा – 03 रिक्त जागा.


पदाचे नाव व पदसंख्या : कँटिंग अटेंडंट


शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून १० वी पास असणे किंवा समकक्ष प्रमाणपत्र तसेच २ वर्षाचा कामाचा अनुभव.





नोकरीचे ठिकाण : पुणे.


अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन.


परीक्षा फी : नाही





वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षांपर्यंत तर SC आणि ST साठी ५ वर्षांची सूट असेल, OBC साठी ०३ वर्ष.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे २०२३





अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जिएसटी आणि कस्टम, पुणे झोन, जिएसटी भवन ससून रोड, ४१ ए, वाडिया कॉलेज पुणे पिन- ४११००१





महत्वाचे –


वरील पदासाठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने असून अर्ज काळजीपूर्वक करावा.

आम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.

अंतिम दिनांक झाल्यानंतर अर्ज बाद ठरला जाईल.

अर्ज करत असताना सोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

सविस्त माहितीसाठी वर दिलेली अधिकृत लिंक किंवा PDF डाउनलोड करू शकता.



जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


अधिकृत लिंक साठी येथे क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने