MTDC Fellowship Program 2023 : MTDC मध्ये तरुणांना नोकरीची संधी, ४० हजार पगार


 




महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवनवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत फेलोशिपची संधी तरुणांना उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी 15 मे पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.




MTDC  अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. 





या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. 




या फेलोशिप उपक्रमाचे नियोजन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.





MTDC फेलोशिप 2023 साठी आवश्यक पात्रता
31 मार्च 2023 रोजी वय 21 ते 26 वर्षे.
उमेदवार कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीसह पदवीधर असावा. तथापि, फेलोशिपच्या क्षेत्रात निर्दिष्ट केल्यानुसार संबंधित क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.





उमेदवारांना किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची अप्रेंटिसशिप अनुभव म्हणून गणली जाईल.
उमेदवाराचे मराठी भाषेवर प्राथमिक प्रभुत्व, संगणक आणि इंटरनेटवर काम करण्याची क्षमता असावी. इंग्रजी आणि हिंदीचे पुरेसे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.




एमटीडीसी फेलोशिप प्रोग्राम 2023 कसा अर्ज करावा

संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 अर्ज महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, १ ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना करावे.





फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने