मुंबई | बँकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी (Union Bank Of India Bharti 2024) उपलब्ध झाली आहे.
कारण देशातील अग्रगण्य युनियन बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. युनियन बँकेने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 606 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज शुल्क –
- GEN/EWS/OBC – Rs. 850/- (Inclusive of GST)
- For SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/- (Inclusive of GST)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
मुख्य व्यवस्थापक-आयटी | B.Sc./B.E./B.Tech. Degree | 05 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी | B.Sc./B.E./B.Tech. Degree | 42 पदे |
व्यवस्थापक-आयटी | B.Sc./B.E./B.Tech. Degree | 04 पदे |
व्यवस्थापक | Any Graduate | 447 पदे |
सहायक व्यवस्थापक | B.E./B.Tech. | 108 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य व्यवस्थापक-आयटी | 76010-2220/4-84890-2500/2-89890 |
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी | 63840-1990/5-73790-2220/2-78230 |
व्यवस्थापक-आयटी | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
व्यवस्थापक | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
सहायक व्यवस्थापक | 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 |
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Union Bank of India Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Union Bank of India
अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/